हातोडा फेक मैदान

 

हातोडा फेक




(हॅमर-थ्रो). 

यातील गोळा शिशाचा अथवा पितळी असून शिसे व ओतीव लोखंडाने भरलेला असतो. त्याची मूठ पोलादी तारेची असून तार ३ मिमी. (१’’ १०) व्यासाची असते. मुठीची पकड व गोळा यांतील लांबी सर्वसामान्यपणे १.२१ मी. (४’) असते. साखळी-मुठीसहित गोळ्याचे वजन कमीत कमी ७.२५७ किग्रॅ. (१६ पौंड) असावे, असा नियम आहे. शालेय स्पर्धांमध्ये मुलांनी वापरावयाच्या उपकरणाचे वजन कमीत कमी १२ पौंड असावे लागते. या गोळ्याची फेक सुरक्षित असावी, म्हणून ८·२२ मी. (२७’) व्यासाचा एक सुरक्षा पिंजरा असतो. तो तीन बाजूंनी बंद असून फक्त फेकीच्या दिशेने उघडा असतो. खुली बाजू ७ मी. (२३’) असते. पिंजरा २ १/४’’  ४ १/२’’ अशा तारेच्या जाळीच्या पडद्याप्रमाणे असतो. उभे राहणे (पवित्रा), गोळा फिरवणे, गिरक्या घेणे व गोळा फेकणे हे हातोडाफेकीतील कृतींचे चार टप्पे आहेत.

0/Post a Comment/Comments