भालाफेक मैदान आखणी

 

भालाफेक

(जॅव्ह्‌लिन-थ्रो). 

भाला तीन भागांचा बनवलेला असतो. भाल्याचा फाळ वा टोक, भाल्याची दांडी आणि भाल्याची मूठ. भाल्याची दांडी लाकडी बांबूची वा धातूपासून बनवलेली असते. दांडी हातात पकडण्यासाठी दांडीच्या मध्यावर दोरी गुंडाळून पकड वा मूठ तयार केलेली असते. भाल्याचे टोक धातूचे व निमुळते बनवलेले असते. हे धातूचे टोक २५ ते ३३ सेंमी., दोरीची मूठ १५ ते १६ सेंमी. व भाल्याची एकूण लांबी २·६० ते २·७० मी. असते.
भाल्याची दांडी मध्यभागी जाड व तेथून दोन्ही टोकांकडे निमुळती होत जाते. भालाफेक करण्यासाठी धावमार्ग किमान ३० मी. ते कमाल ३६·५ मी. लांबीचा असावा. ४ मी. अंतरावर २ समांतर रेषा (५ सेंमी. जाडीच्या) आखाव्यात. नंतर ८ मी. (२६’-३’’) त्रिज्या घेऊन दोन समांतर टोकांना पोचेल, असा कंस आखावा. ही कड धातूची वा लाकडाची करावी आणि तिची जाडी ७ सेंमी. ठेवून ती पांढर्यात रंगाने रंगवून जमिनीच्या पातळीत पक्की करावी.
ही ‘स्क्रॅच लाइन’ असून, तिच्यामागून भालाफेक करावी, असा नियम आहे. ही रेषा ओलांडली, तर फेक बाद ठरते. भाला पकडण्याच्या दोन पद्धती आहेत : (१) अमेरिकन पकड व (२) फिनिश पकड. अमेरिकन पकडीत अंगठा व तर्जनी यांच्या विळख्यात भाला धरला जातो. फिनिश पकडीत मध्यभागी तोल रहावा, म्हणून दोरीने गुंडाळलेल्या जागेचा खालचा भाग हा अंगठा व मधले बोट यांनी मजबूत पकडून, तिरकस तळव्याच्या पोकळीत भाला धरला जातो. तर्जनी ताठ असून दोरीवर असते. भाल्याची पकड, धावत येणे व फेकणे व त्याचबरोबर पायांची अदलाबदल करणे, हे भालाफेकीतील कृतींचे प्रमुख टप्पे आहेत.

0/Post a Comment/Comments